गोवा विद्यापीठाची ६ जूनपासून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा

0
56

गोवा विद्यापीठाकडून महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा ६ जून ते ५ जुलै २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. गोवा विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयाच्या बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., बी.ए.बी.एड्., बी.एस्सी.बी.एड्., बी.कॉम.बी.एड्., बी.सी.ए. आदींच्या दुसर्‍या सत्रातील परीक्षा येत्या ६ जून ते ५ जुलै २०२२ या काळात घेतली जाणार आहे. तसेच, महाविद्यालयातील एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.पी.ए. पदव्युत्तर परीक्षासुद्धा ६ जून ते ५ जुलै या काळात घेतली जाणार आहे. उन्हाळी सुट्टी २९ जून ते १९ जुलै २०२२ दरम्यान असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ला १७ जुलै २०२२ पासून सुरुवात होणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.