गोवा नागरी सेवेतील १९ अधिकार्‍यांच्या बदल्या

0
121

गोवा नागरी सेवेतील १९ अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला आहे. या अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश पर्सनल खात्याचे अवर सचिव शशांक ठाकूर यांनी जारी केला आहे.

कबिर शिरगावकर यांची उच्च शिक्षण संचालनालयात उपसंचालक (विकास) आणि उत्तर विभाग कोमुनिदादच्या प्रशासकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. उदय प्रभुदेसाई यांची सांगेचे उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुडचडे- काकोडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि रवींद्र भवन कुडचडेच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

अजय गावडे यांची सालसेतचे उपजिल्हाधिकारी -१, आंन्तोनियो लॉरेन्स यांची विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयात अवर सचिवपदी, सुधीर केरकर यांची पीडब्लूडीमध्ये खास जमीन संपादन अधिकारी, अक्षय पोटेकर यांची बार्देशच्या उपजिल्हाधिकारी – १, पुंडलिक खोर्जुवेकर यांची आदिवासी कल्याणमध्ये उप संचालकपदी (प्रशासन), दीपेश प्रियोळकर यांची नगरपालिका प्रशासनात उपसंचालक, रोशेल फर्नांडिस यांची अवर सचिव महसूल-२, डॉ. गीता नागवेकर यांची कोमुनिदादच्या मध्य विभागाच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विकास कांबळे यांची नवी दिल्ली गोवा सदनच्या उप निवासी आयुक्त, श्रीकांत महाऊनकर यांची गोवा पोलीस खात्यात उप संचालक, नेहा पानवेलकर यांची गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात उपनिबंधक, प्रितीदास गावकर यांची काणकोणच्या उपजिल्हाधिकारी, श्रीमती व्ही. गोम्स यांची कुंकळ्ळीच्या मुख्याधिकारी, विशाल कुंडकईकर यांची सालसेतच्या उपजिल्हाधिकारी -२, कपिल फडते यांची डीएसएलआरच्या उपसंचालक, चंद्रवा भंडारी यांची डीएफडीएच्या उपसंचालक, तुषार हर्ऴणकर यांची वाणिज्य कर विभागाच्या साहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.