गोवा, कोकणात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता

0
12

हवामान खात्याने गोवा, कोकणासह महाराष्ट्रात व इतर १७ राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. येत्या २-३ दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचा प्रभाव कायम आहे. हवामान खात्याने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस पिवळा अलर्ट जारी केला आहे. पुढचे ३ दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची काही भागांत ११ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.