गोमंतकीय साहित्यिक पद्मश्री मारिया अरोरा कुतो यांचे निधन

0
9

‘गोवा ः अ डॉटर्स स्टोरी’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकामुळे लेखिका म्हणून अत्यंत गाजलेल्या इंग्रजी भाषेतील गोमंतकीय साहित्यिक पद्मश्री मारिया अरोरा कुतो (८०) यांचे काल शुक्रवारी सकाळी अल्पआजाराने निधन झाले.
हळदोणा गावातील ग्रामस्थ असेलल्या कुतो यांना सर्दीचा त्रास होऊ लागल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन पुत्र व एक कन्या असा परिवार आहे. गोवा सरकारचे माजी सल्लागार दिवंगत आल्बान कुतो यांच्या त्या पत्नी होत. २०१० साली भारत सरकारने मारिया यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. कुतो यांनी इंग्रजीतून विपुल साहित्य निर्मिती केलेली आहे.