गोमंतकीयांस १ फेब्रुवारीपासून कॅसिनोंवर प्रवेश बंदी

0
128

कॅसिनोमध्ये प्रवेश करण्यास गोमंतकीयांना १ फेब्रुवारी २०२०पासून बंदी घालण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश एक – दोन दिवसात जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आझाद मैदानावरील हुतात्मा दिन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.

कॅसिनोमध्ये गोवेकरांना प्रवेश बंदी करण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश बंदी करण्याची घोषणा केलेली आहे. परंतु, या निर्णयाची कार्यवाही झालेली नाही. गोमंतकीयांना प्रवेशबंदी करण्यासाठी सरकारी पातळीवरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्य सरकारने जीएसटी आयुक्तांची गेमिंग आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.