गोमंतकीयांना कॅसिनो प्रवेश याचिकेवरील निवाडा राखून

0
34

गोमंतकीयांना कॅसिनोमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल राखून ठेवला.

मांडवी नदीतील कॅसिनो हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. हे कॅसिनो मांडवी नदीतून इतरत्र नेण्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, या मागणीची पूर्तता करणे शक्य होत नसल्याने सरकारने गोवा जुगार कायद्यात दुरुस्ती करून गोमंतकीय नागरिकांना कॅसिनोमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

कॅसिनोमध्ये पर्यटक प्रवेश करू शकतात. मात्र गोमंतकीयांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे उसगावकर नामक एका व्यक्तीने गोवा खंडपीठात विशेष याचिका दाखल करून गोमंतकीय जनतेला कॅसिनोमध्ये प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे. सरकारने नागरिकांचा समानतेचा अधिकार काढून घेतला आहे, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या हितासाठीच ही बंदी घालण्यात आली आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील ऍड. देविदास पांगम यांनी काल केला.