गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रेटिक आझाद पक्ष’ स्थापन

0
8

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काल नवा पक्ष स्थापन केला. ‘डेमोक्रेटिक आझाद पक्ष’ असे या नव्या पक्षाचे नाव आहे. तीन रंगांच्या धर्मनिरपेक्ष ध्वजाचेही आझाद यांच्याकडून अनावरण करण्यात आले. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

कार्यकर्त्यांकडून पक्षासाठी १५०० नावे सुचवण्यात आली होती. त्यानंतर पक्षाचे नाव धर्म आणि संस्कृतीनुसार ठेवण्यात आल्याचे आझाद यांनी सांगितले आहे. देशभरातून पक्षासाठी १५०० नावांची यादी प्राप्त झाली होती. त्यामध्ये काही उर्दू आणि संस्कृत नावांचा समावेश होता. सर्वांना समजेल असे नाव आम्हाला ठेवायचे होते. त्यानुसार डेमोक्रेटिक आझाद पक्ष हे नाव ठेवण्यात आले आहे, असे आझाद म्हणाले.