गुरूवारी राज्यात ७ मृत्यू, ४३२ पॉझिटिव्ह

0
82

राज्यात चोवीस तासात नवे ४३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळीची एकूण संख्या ४८४ झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येने ३७ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार १०२ झाली आहे. सध्याची रुग्णसंख्या ४७१६ एवढी झाली आहे.

४५८ जण कोरोनामुक्त
चोवीस तासांत ४५८ कोरोना रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३१ हजार ९०२ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९८ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ३०४ रुग्णांनी होम आयसोलेशनाचा पर्याय स्वीकारला आहे. राज्यातील होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १७ हजार ९८० एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन ८२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. कोविड प्रयोगशाळेत १४०३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून आत्तापर्यंत २ लाख ६७ हजार ३६२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

पणजीत नवे १७ रुग्ण
पणजी परिसरात नवे १७ रुग्ण आढळून आले असून सध्याच्या रुग्णांची संख्या १८९ झाली आहे.

८ दिवसांत ५६ बळी

राज्यात कोरोना रुग्णाचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या आठ दिवसांत ५६ जणांचा बळी गेला आहे. गोमेकॉमध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झाला. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, एका रुग्णांचा मृत्यू हॉस्पिसिओ इस्पितळात झाला आहे. ताळगाव येथील ६० वर्षांची महिला, दोनापावल येथील ३८ वर्षांचा युवक, पर्वरी येथील ५० वर्षांचा पुरुष, कांदोळी येथील ६५ वर्षांचा पुरुष, काणकोणातील ८४ वर्षांचा पुरुष, हणजूण येथील ५८ वर्षांची महिला रुग्ण आणि नुवे येथील ७२ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.