गुजरातेत ५९ टक्के मतदानाची नोंद

0
7

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. त्यात जवळपास ५९ टक्के मतदान झाले. १८२ सदस्यसंख्या असलेल्या गुजरातच्या विधानसभेसाठी दुसर्‍या टप्प्यातील १४ जिल्ह्यांतील ९३ जागांसाठी काल मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले होते. पहिल्या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले होते. आता ८ डिसेंबरला जाहीर होणार्‍या निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

गुजरात विधानसभेसाठी काल दुसर्‍या टप्प्यात ज्या १४ जिल्ह्यांत मतदान झाले, त्यात बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदयपूर यांचा समावेश आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजता संपली. या कालावधीत ५८.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.