गिरीश चोडणकरांच्या आव्हान याचिकेवर आज होणार सुनावणी

0
102

>> कॉंग्रेस आमदार अपात्रता प्रकरण

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापतींच्या कॉंग्रेस पक्षांच्या दहा आमदारांविरोधात अपात्रता याचिका फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान दिले आहे. याला आव्हान याचिकेवर आज सोमवार ७ जून रोजी सुनावणी होणार आहे.

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांनी जुलै २०१९ मध्ये कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. सभापती राजेश पाटणेकर यांनी ही आमदार अपात्रता याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. सभापतींचा निवाडा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा दावा चोडणकर यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेत केला आहे.