गावठण प्रियोळातील दत्ता नाईक प्रथम

0
130

>> माटोळी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

 

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने यंदाही गणेश चतुर्थीच्या उत्सवात राज्यस्तरावर माटोळी सजावट स्पर्धा घेण्यात आली. यावर्षी १४ स्पर्धक माटोळी सजावट स्पर्धेत सहभागी झाले होते. यात गावठण-प्रियोळ येथील दत्ता नाईक यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. राज्यपातळीवरील माटोळी स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे.
प्रथम पारितोषिक रु. १५,००० दत्ता नाईक गावठण-प्रियोळ फोंडा, द्वितीय : रु. १०,००० श्रीकांत सतरकर, कोपरवाडा, कुर्टी फोंडा, तृतीय : रु. ७,५०० शैलेश गिरोडकर-वेलकासवाडा, सावईवेरे फोंडा. उत्तेजनार्थ विजेते : एकूण ५ प्रत्येकी रु. ५,०००. पहिले : रंगनाथ गावकर गोठावाडा, बेतोडा-फोंडा, दुसरे : दीपक गावकर साट्रे सत्तरी, तिसरे : अंकुश ओजरकर, बांबर नानोडा-सत्तरी, चौथे : तानाजी गावडे तळुले बांदाडा, पाचवे : विशांत गावडे केळबाय कुर्टी फोंडा.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून दयानंद भगत, अशोक नाईक व पौर्णिमा केरकर यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे कला आणि संस्कृती संचालनालयाच्या विशेष कार्यक्रमात दिली जातील. कार्यक्रमाची तारीख नंतर कळविली जाईल.