गाडेमालकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा

0
109

>> मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकार्‍यांना सूचना

बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयासमोरील जे बेकायदा गाडे गुरूवारी पाडण्यात आले आहेत त्या गाड्यांच्या मालकांचे पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनाकेली आहे.

गोमेकॉच्या रुग्णवाहिका, शववाहिका तसेच गोमेकॉकडे जाणारी व येणारी वाहने यांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी या गाडेवाल्यांचे पुनर्वसन केले जावे व त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी गोमेकॉचे अधिकारी, स्थानिक आमदार, पंचायत सदस्य आदींना विश्‍वासात घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्ेहधिकार्‍यांना केली आहे.

या बेकायदा गाड्यांच्या मालकांना यापूर्वी अनेक वेळा हे गाडे हलवण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या होता. या गाड्यांपैकी काही गाडे हे परराज्यातून आलेल्या लोकांना भाडेपट्टीवर देण्यात आलेले असून अशा गाड्यांचे पुनर्वसन केले जाऊ नये, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना कळवले आहे.

दरम्यान, पाडण्यात आलेल्या गाड्यापैकी सुमारे ७०% गाडे हे भाडेपट्टीवर चालवण्यात देण्यात आले असल्याचे स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांचे म्हणणे आहे.

गाडेवाल्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे व त्यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचे सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी स्पष्ट केले आहे.