गांगुलीच सर्वोत्तम कर्णधार

0
129

>> माजी कसोटीपटू मनिंदर सिंग यांचे मत

आता भारताचे माजी फिरकीपटू मनिंदर सिंग यांनी सौरव गांगुली हाच भारताचा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी व सर्वोत्तम कर्णधार असल्याचे मत व्यक्त केले आहे. कोणत्याही कर्णधाराची श्रेष्ठता ही त्याने संघाला किती सामने किंवा स्पर्धा जिंकून दिल्या आहेत, यावरुन करता येत नाही. तर, त्याने खेळाडूंमध्ये किती विश्‍वास निर्माण केला व खेळाडूंचे कशा प्रकारे समर्थन केले यावरून ठरते, असे मनिंदर म्हणाले.

गांगुलीने भारतीय संघात एक प्रकारचा विश्‍वास निर्माण केला. त्यामुळे संघ कोणत्याही परिस्थितीत सामने जिंकू शकत होता. त्याने संघाला अनेक शानदार खेळाडू दिले.

धोनी नशीबवान होता की, त्याच्यापूर्वी कपिलने १९८३मध्ये भारताला विश्‍वचषक जिंकून दिला होता आणि धोनीपूर्वी गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यामुळे धोनीला सर्वात मोठा फायदा झाला. कपिलदेवच्या नेतृत्त्वाखाली खेळलेले मनिंदर म्हणाले की, मला कपिलपेक्षा गांगुलीची नेतृत्त्व करण्याची शैली आवडत होती. तो टॅलेंटची पारख करण्यात खूप चांगला होता. त्याने युवराज सिंगला घडवले आणि संघातून बाहेर काढलेल्या हरभजन सिंगचा पुन्हा संघात समावेश केला.

माझ्या मते, गांगुलीनेच झहीर खानला काउंटी क्रिकेट खेळायला सांगितले होते आणि त्यानंतर आम्हाला वेगळाच झहीर खान पाहायला मिळाला. झहीरमधील बदलाचे श्रेय गांगुली यालाच जाते. माझ्यासाठी गांगुली हाच सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे.