गझलकार भूपिंदर सिंह यांचे मुंबई येथे निधन

0
14

बॉलिवूडमधील प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे काल सोमवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते. त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झाले होते. अखेर काल सोमवारी मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. भूपिंदर सिंह यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.