खाणप्रश्‍नी याचिका पुन्हा लांबणीवर

0
287

सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाणप्रश्‍नी याचिका सुनावणीसाठी काल आली नाही. खाणप्रश्‍नी याचिकेवर आता येत्या २५ सप्टेंबरला सुनावणी घेतली जाण्याची शक्यता ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाणप्रश्‍नी याचिका बुधवारी सुनावणीसाठी निश्‍चित करण्यात आली होती. परंतु, न्यायालयातील एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे गोव्यातील खाणप्रश्‍नी याचिका सुनावणीला येऊ शकली नाही, अशी माहिती ऍड. पांगम यांनी दिली. गोव्यातील खाणप्रश्‍नी याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलावी लागली आहे. खाणप्रश्‍नी याचिकेच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.