खनिजवाहू ट्रकांना रस्ता कर माफ ः मुख्यमंत्री

0
169

राज्यातील खनिजवाहू टिप्पर ट्रक मालकांना आर्थिक वर्ष २०१६-२०१७ मधील सुमारे ७.२२ कोटी रुपयांचा रस्ता कर माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सर्क्युलेशन पद्धतीने काल मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

खनिजवाहू टिप्पर ट्रक मालकांना एका वर्षाचा रस्ता कर माफ करण्याच्या निर्णयाने सरकारी तिजोरीला ७ कोटी २२ लाख ३७ हजार ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. सरकारला एक निवेदन सादर करून रस्ता करात सूट देण्याची विनंती केली होती. टिप्पर ट्रक मालकांना वार्षिक ९४८० रुपये रस्ता कर भरावा लागत होता. राज्यात सुमारे ७ हजार ६२० टिप्पर ट्रक मालकांना रस्ता करात सूट देण्यात आली आहे.