कोव्हॅक्सिन लशीची मुलांवरील चाचणी पूर्ण

0
44

भारत बायोटेक या कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लहान मुलांवरील लशीची चाचणी सुरू होती. ही चाचणी आता पूर्ण झाली आहे. भारत बायोटेक आता ह्या चाचण्यांची संपूर्ण माहिती पुढील आठवड्यात डॅग्ज कंट्रोलर डनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) सोपवणार आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी ही लस कधीपासून सुरू करता येईल यावर विचार करण्यात येणार आहे. दरम्यान, फायजर या कंपनीनेही ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी निर्माण केलेल्या लशींची चाचणी पूर्ण झाली असल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झालेली नाही. दरम्यान, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे २ कोटी डोसनी उत्पादन वाढवले असल्याची माहिती दिली आहे. सध्या भारत बायोटेक साडेतीन कोटी डोसचे उत्पादन करते. मात्र आता दोन कोटींनी उत्पादन वाढवल्यामुळे कोव्हॅक्सिनचे साडेपाच कोटी डोस उत्पादन होणार आहे.