कोविड मार्गदर्शक तत्त्वे ३१ ऑगस्टपर्यंत लागू

0
43

>> केंद्र सरकारची राज्यांना सूचना

देशात कोरोनाची लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र तरीही केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-१९ मार्गदर्शक तत्वे ३१ ऑगस्टपर्यंत लागू करण्याच्या सूचना दिली आहे. तसेच राज्यांना पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण जास्त असणार्‍या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यास सांगितले आहे. केंद्राने पॉझिटिव्ही रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांत कडक पावले उचलण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात कोविड -१९ प्रकरणांमध्ये घट होत असली तरी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.