कोविडमुळे चोवीस तासांत पाचजणांचा मृत्यू

0
42

काल कोविडमुळे २४ तासांत तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला. तर ७२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.
मृतांची संख्या ३२०८ वर पोहोचली असून राज्यातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ९०० वर आली आहे. काल ५३७४ जणांची कोविडसाठी चाचणी केली असता त्यापैकी ७२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यात कोविड पॉझिटिव्हीटी दर हा १.३ टक्के एवढा आहे. कोरोना संसर्गामुळे इस्पिळात भरती करावी लागणार्‍या रुग्णांची संख्या आता कमी वेगाने का होईना पण वाढू लागलेली असून गेल्या २४ तासांत २२ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ८९ एवढी आहे. तर इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची संख्या ही ७ एवढी आहे.

पाचजणांचा मृत्यू
या घडीला मडगांव येथे ५२, पणजीत ७१, म्हापसा ४३, कांदोळी ४४, चिंबल ४८, कांसावली ४३, शिवोली ४३, पर्वरी ३९, चिंचोणे ३३, कुठ्ठाळी ३२, फोंडा २६, नावेली २२, अशी रुग्ण संख्या आहे.
कालच्या मृतांमध्ये बेताळभाटी येथील ५२ वर्षीय महिला, कोलवा येथील ४९ वर्षीय महिला, देवगड येथील ८२ वर्षीय इसम, पणजी येथील ९६ वर्षीय महिला व पाळोळे येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७०,३११ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७४,४१९ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२,३६,८०९ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२१,७९४ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,१४८ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.