कोल्हापुरातील आंदोलन प्रकरणी 36 जणांना अटक

0
5

शिवराज्याभिषेक काही अल्पवयीन मुलांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर ओरंगजेबाचे फोटो ठेवल्याप्रकरणी बुधवारी कोल्हापुरात हिंसक आंदोलन झाले होते. आताही कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता असून, या प्रकरणी पोलिसांनी 36 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना काल बालन्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

स्टेटस ठेवणारे हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. ते कोणाशी संबंधित आहेत का? त्यांना कोणी चिथावणी दिली होती का? यासंबंधीचा तपास सुरू आहे. औरंगजेबाचे फोटो व्हॉट्सॲपला ठेवणाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल जप्त केल्यानंतर मोबाईल तपासणी करताना त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, त्यांनी स्टेटसला ठेवलेले व्हिडिओ आणि फोटो त्यांना कुठून मिळाले होते, याचीही तपासणी सुरू आहे, असे महेंद्र पंडित यांनी सांगितले.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती काल दुपारपासून पूर्ववत झाली आहे. 4 एसपीआरएफच्या तुकड्या, 300 पोलीस कॉन्स्टेबल, 60 पोलीस अधिकारी अद्यापही तैनात केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.