कोरोना सक्रिय रुग्णांची राज्यातील संख्या ३००

0
25

राज्यात गेल्या चोवीस तासांत एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ३१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३०० झाली आहे.

कोरोना बळींची एकूण संख्या ३३६८ एवढी झाली आहे. काल कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून ३ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहेत. तर कोरनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ५ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या चोवीस तासांत ४३ बाधित बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के एवढे आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १.१० टक्के एवढे आहे.