>> केंद्रीय आरोेग्य संचालनालयाचा इशारा
देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कायम असून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा केंद्रीय आरोग्य संचालनालयाकडून देण्यात आला आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. काल देशातील कोरोनाबाधितांची संख्येत घट दिसून आली असून गेल्या २४ तासांत ३४३ नवीन रुग्ण आढळले. तर चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान, जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
चीनमध्ये आंदोलन
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. काल रविवारी ४० हजार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधाविरोधात चीनचे नागरिक रस्त्यावर उतरले असून, राष्ट्रपती शी जिनपींग यांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.