कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

0
396
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

२०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही चिंता नको, मनाचे- मानसिक आरोग्य सुदृढ बनवायचे. कोरोनावर औषध नाही म्हणता, मग आपल्या हातात काय आहे? तर… आपल्या हातात आहे ‘व्याधिप्रतिकारशक्ती’ वाढवणे.

कोरोना व्हायरस, कोविड-१९, लॉकडाऊन, क्वारंटाइन, इम्युनिटी बूस्टर हे सारे शब्द आता वारंवार कानावर पडत आहेत. या कोविड-१९ व्यतिरिक्त कसलीच चर्चा होताना दिसत नाही आणि सरळ आहे, योग्यही आहे कारण ‘आरोग्य हेच धन आहे.’ हा काळ फक्त आरोग्य जपण्याचा आहे. जगलो तर पुढे मवू, शिकू, फिरायला जाऊ, जीवनाची मजा लुटू… हे साधारण आता सगळ्यांनाच स्पष्ट झाले आहे. २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही चिंता नको, मनाचे – मानसिक आरोग्य सुदृढ बनवायचे. पण कसे? असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात उद्भवला असेल. कोरोनावर औषध नाही म्हणता, लसीची उपयुक्तता माहीत नाही. मग आपल्या हातात काय आहे??? तर… आपल्या हातात आहे ‘व्याधिप्रतिकारशक्ती’ वाढवणे. म्हणूनच सारखे ‘इमन्युनिटी बूस्टर’ सारखे शब्द तुम्ही रोज ऐकता. त्याने काय होणार… म्हणून दुर्लक्ष करू नका. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी उपाय हे चालू ठेवावेत. थोडातरी उपयोग नक्की होईल.
व्याधिक्षमत्व म्हणजे काय? –
‘व्याधिक्षमत्वं नाम व्याधिबलविरोधित्वं व्याध्युत्पादप्रतिबंधक त्वमिति|’
रोग उत्पन्न करणार्‍या कारणांचा शरीराशी संबंध आल्यानंतर शरीरात विकृती किंवा रोग उत्पन्न करण्याकडे त्यांचा कल असतो. परंतु शरीराचा त्याचवेळी रोग उत्पन्न होऊ न देण्याकडे प्रयत्न सुरू होतो. यामध्ये शरीराचा हा जो व्याधिविरोधी प्रयत्न कार्य करीत असतो त्यालाच व्याधिक्षमत्व म्हणतात. हे प्रयत्न दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे रोग उत्पन्न होऊ न देणे व दुसरा म्हणजे रोग झाला तरी तो बलवान होऊ न देणे म्हणजे रोगाच्या बलाला विरोध करणे.

काही व्यक्ती वारंवार अपथ्यसेवन करूनही रोगाला बळी पडत नाहीत तर इतर काहींनी पथ्यपालन केले तरीही त्यांना रोग होतात. याचे रहस्य व्याधिक्षमत्वाचे बल उत्तम किंवा हीन असणे हेच आहे. व्याधिक्षमत्व उत्तम असेल तर होणारा व्याधी सौम्य स्वरूपाचा असतो व तो लवकर बरा होतो. काही वेळा त्यावर चिकित्सा न करताही व्याधिक्षमत्वाच्या प्रभावाने बरा होतो. म्हणूनच रोग उत्पन्न करणार्‍या कोरोना व्हायरसपेक्षा आपले व्याधिविरोधी शरीरबल, मनोबल प्रभावी असेल तर कोरोना विषाणूंचा प्रभाव पडणार नाही व संसर्गाची लागण होणार नाही.

शरीरातील रक्त, मांस व अस्थिधातूंवर शरीरबल अवलंबून असते. शरीर धातू हे मात्रावत्, आहारविधी- विशेषायतन, प्रकृती व सात्म्य यांचा विचार करून केलेल्या अन्नसेवनावर आणि रसायन औषधांवर पूर्णपणे अवलंबून असते. शरीरबल उत्तम असल्यास व्याधिक्षमत्व असते तसेच मानसिक बलाचेही प्रवरसत्व, व्याधिक्षमत्व टिकविण्यात बरेच महत्त्वाचे स्थान आहे. भीरुता (भित्रेपणा) असल्याने रोग वाढतो. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे शारीरिक, मानसिक बल म्हणजे ओज होय. दोन्ही प्रकारचे बल प्राकृत ठेवण्यासाठी ओज आवश्यक असते. व्याधिक्षमत्व किंवा अक्षमत्व उत्पन्न करणारा आणखी एक प्रमुख घटक म्हणजे अग्नी- ‘‘रोगा सर्वेऽपि मंदेऽग्नौ|’’ या सूत्रानुसार व्याधी उत्पन्न न होऊ देण्यात अग्नीचे महत्त्व आहे. म्हणूनच कोरोना विषाणूच्या लढ्यात सर्वांत जास्त महत्त्व हे व्याधिक्षमत्वाला दिलेले आहे व हे व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी संतुलित आहार, उत्तम पाचन करणारी औषधे, शारीरिक बल, ओज वर्धनासाठी रसायन द्रव्य सेवन तसेच मानसिक आरोग्यासाठी यम, नियम, प्राणायामाद्वारे योगसाधना सांगितली आहे.

रसायनाद्वारे व्याधिक्षमत्व –
रसादी सप्तधातूंच्या वर्धनासाठी ज्या उपक्रमांचा उपयोग केला जातो, त्यांना रसायन असे म्हणतात. रसायनाद्वारे प्रशस्त अशा धातूंची निर्मिती होत असल्याने साहजिकच बलवर्धन होते, ज्यामुळे शरीरातील व्याधिक्षमत्व – व्याधिप्रतिकारशक्ती वाढते व रोगनाशन घडते.

रसायनद्रव्ये –
रसायनाचे कार्य चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी त्या त्या धातूंच्या पोषक भावांची शरीराला आवश्यकता असते. सप्तधातुवर्धनाच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास दूध हे उत्कृष्ट आहे.

  • रसधातू ः खर्जुरमंथ, लाजामंड, गुडूची (गुळवेल)
  • रक्तधातू ः लोह, तामॅ, अभ्रक, रौप्य, घृत, गोरोचन, भृंगराज, मंजिष्ठा आणि गुडूचि (गुळवेल)
  • मांसधातू ः मांसरस, सुवर्णभस्म, कुष्मांड, बला, नागबला, शतावरी
  • मेदधातू ः सर्वच स्निग्ध पदार्थ, शिलाजित, गुग्गुळ
  • अस्थिधातू ः प्रवाळ, अजास्थिभस्म, कुक्कुटाण्डत्वक भस्म, बाभळीचा डिंक
  • मज्जाधातू ः घृत, रौप्यभस्म, वचा, भृंगराज
  • शुक्रधातू ः दूध, वंगभस्म, अश्‍वगंधा, शतावरी.
  • प्राणवह स्रोतस ः पिंपळी, भल्लातक, मरिच, आमलकी, गुडूची
  • अन्नवह स्रोतस ः पंचकोल, कपर्दिक, शंखभस्म इत्यादी.
    कोरोना विषाणू संसर्गात प्राणवह स्रोतस व अन्नवह स्रोतस विशेषरूपाने दूषित होत असल्याने गुडूची (गुळवेल), ज्येष्ठमध, पिप्पली, आमलकी (आवळा), अश्‍वगंधा ही द्रव्ये विशेष उपयुक्त ठरतात.
  • गुळवेल – हे एक श्रेष्ठ रसायन आहे. हिला अमृताही म्हणतात. गुळवेल त्रिदोष शामक आहे. आमाशयालगत अम्लता कमी करणारी, हृदयाला बल देणारी, प्रमेह, रक्तविकार, दौर्बल्य, खोकला, सगळ्या प्रकारच्या तापांमध्ये विशेष गुणकारी.
    गुळवेल ही सूक्ष्मतम विषाणू समूहापासून स्थूल कृमींवर विशेष कार्य करणारी वनस्पती द्रव्य आहे. म्हणूनच गुळवेल स्वरस, गुळवेल काढा, गुळवेल घनवटी, गुळवेल सत्त्व कोणत्याही प्रकारे गुळवेलचे सेवन या कोरोना विषाणूच्या लढ्यात करावे.
  • ज्येष्ठमध ः यालाच गोव्यात गोडेकाष्ठ असे म्हणतात. सर्दी, खोकला, तापावर अगदी लहानपणापासून याचा काढा आपण पित आलो आहोत. प्राणवह स्रोतसांवरील श्रेष्ठ रसायन द्रव्य होय. संशोधनाद्वारे हे द्रव्य कँसरच्या गाठींवर उपयुक्त आहे हे सिद्ध झालेले आहे. यातील ग्लायसिरिझिक ऍसिड विषाणूंवर कार्यरत होऊन विषाणूंची वाढ होण्यापासून रोखते.
  • पिप्पली – पिंपळी हेही एक उत्कृष्ट रसायन द्रव्य आहे. विशेषतः रोगनाशन रसायन म्हणून याचा अधिक उपयोग होतो. कास, क्षयरोग, शोथ, श्‍वास, हिक्का, गलविकार, विषमज्वर, स्वरभेदपीनस, वातबलासक ज्वर इ. रोगांवर पिंपळी ही रसायन म्हणून उत्कृष्ट कार्य करते.
  • आमलकी – सहस्रवर्षं आयुष्य प्राप्त करून देणारे, जरा-व्याधी यांचा नाश करणारे, बुद्धी व इंद्रिये यांना बल देणारे असे हे उत्कृष्ट रसायनद्रव्य आहे. आमलकी चूर्ण, आमलक रसायन किंवा च्यवनप्राश कोणत्याही प्रकारे आवळ्याचे सेवन करावे, प्राणवह स्रोतसाला बल देण्यासाठी हे एक उत्कृष्ट रसायन आहे. कास, श्‍वास, धतक्षीण, हृद्रोग, वातरक्त यासाठी च्यवनप्राश अत्यंत उपयुक्त ठरते.
  • अश्‍वगंधा – या द्रव्यांवरसुद्धा संशोधन चालू आहे. संशोधनानुसार अश्‍वगंधा हे उत्तम इम्युनिटी बूस्टर द्रव्य आहे. सप्तधातूंचे वर्धन करणारे, अगदी ओजावरही कार्य करणारे औषधी द्रव्य होय. कोरोना संसर्गात अश्‍वगंधा चूर्ण, अश्‍वगंधा वटी कुठल्याही स्वरूपात याचे सेवन करावे.
    म्हणूनच आयुष काढ्यामध्ये अश्‍वगंधा, गुडूची, आमलकी, पिप्पली, ज्येष्ठमध अशा औषधी द्रव्यांचा समावेश आहे.
    अशा प्रकारच्या रसायन द्रव्यांच्या सेवनाने प्रत्येकाचे व्याधिक्षमत्व नक्कीच वाढेल. वैद्याच्या सल्ल्याने औषधी द्रव्यांचे सेवन करा. रोगप्रतिकारशक्ती वाढवा म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा