कोरोना लशीचा तुटवडा नाही

0
166

>> केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

देशातील कोणत्याही भागात कोरोना लशीचा तुटवडा नाही. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. मंगळवारी हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून अनेक त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपणाने कोरोना वाढल्याचे सांगितले. हर्षवर्धन यांनी यावेळी कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती दिली. एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून याआधी असलेले धोरण आपण नीट राबवल्यास संख्या कमी होईल. पण लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढल्याचे ते म्हणाले.

कारमध्ये एकटे असल्यासही
मास्क बंधनकारक

एक व्यक्ती जरी खासगी वाहनातून प्रवास करत असेल, तरीही त्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कारमधून एकट्याने प्रवास करणार्‍यांनाही दिल्ली सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केल्यामुळे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क हे सुरक्षा कवच असल्याचे म्हटले आहे.