कोरोना महामारीमुळेच पावसाळी अधिवेशन तीन दिवस ः मुख्यमंत्री

0
41

राज्यातील कोरोना महामारी लक्षात घेऊन गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तीन दिवसांचे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात कोरोना महामारीच्या परिस्थितीत महिनाभरापासून सुधारणा होत आहे. येत्या २८ ते ३० जुलै दरम्यान अधिवेशन होणार आहे. कोरोना महामारीच्या आगामी अधिवेशन होईपर्यंत राज्यातील परिस्थितीबाबत कुणीच काहीच सांगू शकत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या विषयावर गंभीरपणे चर्चा करावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कामकाजाचा आढावा
गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्शभूमीवर खात्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात सुरूवात केली आहे. गुरूवारी गृहखात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन नोकर भरती आणि नोकरीमधील बढती देताना येणार्‍या अडीअडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

पोलीस खात्यात सुमारे दोन हजार जणांची भरती केली जाणार आहे. १३०० जणांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस खात्यात बढत्यंाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाल काढण्यासाठी कायद्यात दुरुस्तीची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. वन व इतर खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.