कोरोना उपाययोजनेसंबंधीची याचिका निकालात

0
128

येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणू उपाय योजनेबाबत दाखल केलेली याचिका राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाय योजना केली जात असल्याने निकालात काढण्यात आली आहे.

राज्यात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी गोवा खंडपीठात एक याचिका दाखल करून कोरोना विषाणू उपाय योजनेबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. राज्य सरकारने या याचिकेला अनुसरून गोवा खंडपीठात कोरोना विषाणू रोखण्यासाठी सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची प्रतिज्ञापत्रातून सविस्तर माहिती दिली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या स्पष्टीकरणाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त करून याचिका निकालात काढली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.