कोरोनामुळे दिल्लीत विकेण्ड संचारबंदी ः केजरीवाल

0
149

कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू (संचारबंदी) लावत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी, संचारबंदीमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. तसेच आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना पासद्वारे परवानगी असेल असे सांगितले.