कोरोनामुळे चोवीस तासांत एकाचा मृत्यू, १०४ बाधित

0
47

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले १०४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. नव्याने केलेल्या ४७९१ जणांच्या स्वॅब चाचण्यांत १०४ जणांना कोरोचा ससर्स्ग झाल्याचे आढळून आले आहे.

ही टक्केवारी २.१७ टक्के एवढी आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत १२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ८९६ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२०३ एवढी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ५ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ११ एवढी आहे. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ९३ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण पणजी येथे असून त्यांची संख्या ६८ झाली आहे. त्या खालोखाल काणकोणात ५९, मडगाव ५०, शिवोली ४५ कासावली ४५, चिंचिणी ४२, कुठ्ठाळी ४०, पर्वरी ३९, चिंबल ३८, म्हापसा ३२, कांदोळी ३५, अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७०,१५१ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७४,२५० एवढी झाली आहे. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२१,६६७ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,१०६ एवढी आहे.