कोरोनाने २ मृत्यू, १५२ बाधित

0
39

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४३२२ स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात १५२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या.

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ३१४६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १०९३ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७१,०५२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५२ टक्के आहे. तर रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३.५२ टक्क्यांवर आले आहे. सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८५ आहे. कुठ्ठाळी ५०, पणजी ५९, कासावली ५३, पेडणे ५७, शिवोली ५७ अशी इतरत्र रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

१३४ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात १३४ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६६,८१३ एवढी झाली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १९ जणांना भरती करण्यात आले. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १३३ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.