कोरोनाने २ बळी, ८१ बाधित

0
52

>> राज्यात पॉझिटिव्हिटी १.९२ टक्क्यांवर

राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावात चढउतार दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४२१० स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात ८१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ३१४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ११३० एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७०,८१० एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाण १.९२ टक्क्यांवर आले आहे.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ७१ आहे. फोंडा ६२, पेडणे ६१, पणजी ६०, कासावली ५६, अशी इतरत्र रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,५८४ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१८,७४९ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत १०,४३,२१२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

चोवीस तासांत १२७ कोरोनामुक्त

गेल्या चोवीस तासांत राज्यात १२७ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६६,५८६ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १४ जणांना भरती करण्यात आले.

काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ६७ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.