कोरोनाने राज्यात काल आणखी दोघांचा मृत्यू

0
196

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७६८ एवढी आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ४०९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ७५० एवढी आहे.

राज्यातील आणखी ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८९१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१५ टक्के एवढे आहे.
कोरोनाच्या सौम्य लक्षण असलेल्या नवीन २९ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन २० कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात चोवीस तासांत नवीन १३९६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३.७९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पणजी परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. पर्वरी येथील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. मडगाव परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९२ झाली आहे.