कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

0
232

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने आत्तापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची एकूण संख्या ६७९ झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येने ४७ हजारांचा टप्पा पार केला आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत नवीन २००४ स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीत १६७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार ०६८ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १२२१ एवढी झाली आहे.

दोघांचा मृत्यू
राज्यात आणखी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
गोमेकॉमध्ये मडगाव येथील ६५ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आसगाव येथील ५८ वर्षीय रुग्णाला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात मृतावस्थेत आणण्यात आला. त्याचा मरणोत्तर कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या दैनंदिन अहवालात देण्यात आली आहे.

८५ जण कोरोनामुक्त
चोवीस तासांत आणखी ८५ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार १६८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ८१ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३६ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंत १३ हजार ०७० रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पणजी परिसरात नवीन ५ रुग्ण
पणजी परिसरात नवीन ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. मिरामार येथील एका हॉटेलमध्ये राहणारा दिल्लीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सांतइनेज, पाटो-रायबंदर, मळा या भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८७ झाली आहे.

रुग्णसंख्येत घट
मडगाव परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०२ एवढी आहे. फोंडा येथे ८२ रुग्ण, वास्को येथे ७४ रुग्ण, कुठ्ठाळी येथे ५० रुग्ण, पर्वरी येथे ८२ रुग्ण, चिंबल येथे ६० रुग्ण, शिवोली येथे ५१ रुग्ण, कांदोळी येथे ७१ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.