कोरोनाच्या बळींत पुन्हा वाढ

0
81

>> रविवारी ६ मृत्यू, ७५ बाधित

राज्यात नवे ७५ रुग्ण आढळून आले असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ११५८ एवढी झाली आहे. रुग्णांच्या बळींची एकूण संख्या ३१३२ एवढी झाली आहे.

राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.१८ टक्के एवढे आहे. राज्यात नवे रुग्ण आणि बळी यांच्यात चढउतार सुरू आहे. राज्यात शनिवारी शून्य बळीची नोंद झाली होती. राज्यात रविवारी ६ बळींची नोंद झाली आहे. वाळपई येथील २४ वर्षीय युवकाचा बळींमध्ये समावेश आहे.

इस्पितळातून १६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७० हजार ४९१ एवढी झाली आहे. आणखी १७ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासांत ३४४८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आणखी ५८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. आणखी १४९ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार २०१ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के एवढे आहे.

देशात ४३ कोटींचे लसीकरण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत लशीचे ४३ कोटी २६ लाख ५ हजार ५६७ डोस देण्यात आले आहेत. त्यातील शनिवारी जवळपास ४६ लाख लशीचे डोस देण्यात आले आहेत. काल ४५ लाख ७४ हजार २९८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात ५३५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तसेच गेल्या २४ तासांत ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.