कोरोनाच्या बळींची संख्या दीडशेच्या जवळ

0
318

>> पणजीत नवे १३ रुग्ण

राज्यात कोरोनाने आणखी ४ जणांचा बळी घेतला आहे. कोरोना बळींची संख्या दीडशेच्या जवळ येऊन ठेपली असून १४८ वर पोहोचली आहे. काल नवे १३९ रुग्ण आढळून आले असून सध्याच्या रुग्णांची संख्या ३०८१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना एकूण रुग्णांची संख्या १४१३८ झाली आहे.

राज्यात कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यात २४ दिवसांत १०३ जणांचा बळी गेला आहे.
मोतीडोंगर – मडगाव येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाला मृतावस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. त्या रुग्णाचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वास्को येथील ६७ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात रविवारी निधन झाले. बाळ्ळी येथील ५० वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगावच्या कोविड इस्पितळात काल निधन झाले. फातोर्डा येथील ५५ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रविवारी निधन झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.