कोरोनाचे नवीन ६० रुग्ण; मृत्यू नाही

0
196

राज्यात चोवीस तासांत एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. नवीन ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ४६९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ७२४ एवढी आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७६८ एवढी आहे. राज्यातील आणखी ८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ९७७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के एवढे आहे.

कोरोनाची सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन ३३ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यात चोवीस तासांत नवीन १३६३ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.४० टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. या भागातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. पणजी परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. पर्वरी येथील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. मडगाव परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९४ झाली आहे.