कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

0
14

मालपे-पेडणे येथे बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल, माती व पाणी रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक मंगळवारी सायंकाळपासून ठप्प झाली होती. या बोगद्यातील चिखल व माती हटवण्याचे युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर काल रात्री 8.35 च्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली.
मालपे-पेडणे येथील बोगद्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी व माती आल्याने मुंबईहून गोव्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे सावंतवाडी स्थानकात थांबवण्यात होत्या, तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यातील विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी गोव्यातील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तसेच काही रेल्वे अन्य मार्गाने वळवण्यात आल्या, तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या.
कामगारांनी दिवसभरात युद्धपातळीवर काम करून रुळांवर साचलेला चिखल व माती हटवली. त्यानंतर काल रात्री कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली.