कोकण किनारपट्टीत दोन दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

0
32

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ सोमवारी निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.