कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकरांचा राजीनामा

0
116

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतरही एकाही नेत्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच राज्यातील मुख्यमंत्री, महासचिव, प्रदेशाध्यक्षांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची हिम्मत दाखवली नाही, अशी खंत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर देशभरात कॉंग्रेसच्या १२० पदाधिकार्‍यांनी काल तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. त्यात गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा समावेश आहे. राजीनामे दिलेल्या कॉंग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये कार्यकारी अध्यक्ष, सचिव, यूथ कॉंग्रेस, महिला अध्यक्षांचा समावेश आहे.