केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

0
176

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्र सरकारच्या राज्यातील २७ खात्याच्या खाते प्रमुखाशी काल चर्चा केली. राज्यात केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय उभारण्यासाठी म्हापसा परिसराच्या आसपास जागेची पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.