केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आज गोव्यात

0
26

केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या भेटीवर गोव्यात येत असून, दक्षिण गोव्यात भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या बैठक घेणार आहेत.

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे.
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर दोन दिवसांच्या गोवा भेटीत दक्षिण गोव्यातील भाजपच्या प्रचारासाठी बैठका घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत.