केंद्रिय मंत्री गिरिराज सिंग यांनी घेतली श्रीपाद नाईक यांची भेट

0
192

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार घेणार्‍या केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
भाजपच्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचे गोव्यात काल आगमन झाले आहे. केंद्रीय मंत्री सिंग यांनी गोव्यात दाखल झाल्यानंतर प्रथम बांबोळी येथील इस्पितळात जाऊन केंद्रीय मंत्री नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गेल्या महिन्यात उत्तर कर्नाटकात झालेल्या वाहन अपघातात केंद्रीय आयुषमंत्री नाईक गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचे निधन झाले होते. केंद्रीय मंत्री नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे गोमेकॉच्या डॉक्टरनी यावेळी सांगितले.