कृषी कायद्यांचा मसुदा न्यायालयात असूनही शेतकर्‍यांचे आंदोलन का?

0
34

>> सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नव्या कृषी कायद्यांचा मसुदा न्यायालयात असतानाही शेतकरी आंदोलन का करत आहेत असा सवाल काल सर्वोच्च न्यायालयाने केला. कृषी कायद्यांवर स्थगिती आणली आहे आणि सध्या या कायद्यांची अंमलबजावणी करू इच्छित नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. मग आंदोलन कशासाठी चालले असा सवाल न्यायालयाने आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांना केला आहे. दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांच्या ४० नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. रस्ते अडवून आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांविरोधात ही नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळीही न्यायालयाने आंदोलकांना फटकारले होते.