कुंभारजुवा नागरिक समितीचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

0
115
चित्ररथ स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकाविलेल्या कुंभारजुवा नागरिक समितीला बक्षीस प्रदान करताना श्रीनिवास धेंपो, मंगलदास नाईक व इतर (छाया : किशोर स. नाईक)

पणजी शिगमोत्सव समितीच्या विविध स्पर्धांचा निकाल
पणजी शिगमोत्सव समितीतर्फे गोवा शासनाच्या पर्यटन खात्याच्या सौजन्याने घेतलेल्या चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा या स्पर्धांना भरघोस प्रतिसाद लाभला. चित्ररथ स्पर्धेतील ७५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक कुंभारजुवा नागरिक समितीच्या चित्ररथाला प्राप्त झाले. त्यांना मंगलदास नाईक यांनी आपल्या मातोश्री श्रीमती पुतू नाईक यांच्या स्मरणार्थ ठेवलेला चषक देण्यात आला.रोमटामेळ स्पर्धेतील ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक सावर्डे शिगमोत्सव मंडळाला प्राप्त झाले. त्यांना किशोर नार्वेकर यांनी आपले बंधू कृष्णा नार्वेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवलेला चषकही प्राप्त झाला तर लोकनृत्य स्पर्धेतील २० हजारांचे प्रथम पारितोषिक सिध्दी विनायक म्हालसा कला संघ, म्हार्दोळला प्राप्त झाले. त्यांना रमेश सिलीमखान यांनी आपल्या दिवंगत मातोश्रीच्या स्मरणार्थ ठेवलेला चषकही देण्यात आला.
सविस्तर निकालाप्रमाणे : चित्ररथ स्पर्धा – द्वितीय (६० हजार रुपये) – त्रिवेणी कला संघ फोंडा, तृतीय (५० हजार रुपये)- आडपई युवक संघ, उत्तेजनार्थ- प्रथम- (३० हजार रुपये)- प्रीन्स ऑफ मळा स्पोर्ट्‌स, द्वितीय- (वीस हजार)- सत्यनारायण स्पोर्ट्‌स क्लब मेरशी- तृतीय (पंधरा हजार)- बांदोडा युवा समिती, चौथे (बारा हजार)- मेरशी सांस्कृतिक ट्रस्ट, पाचवे (दहा हजार), भगवती कला संघ, फोंडा. शिवाय प्रत्येकी सहा हजार रुपयाची पंधरा व दोन हजारांची तेरा पारितोषिके देण्यात आली.
रोमटामेळ स्पर्धा : द्वितीय (पस्तीस हजार)- श्री शष्टी शांतादुर्गा कला मंडळ- डोंगरी, तृतीय- (पंचवीस हजार) – कुडचडे काकोडा युवक मंडळ, चौथे (दहा हजार)- नवदुर्गा गोपाळ कृष्ण – बोरी, पाचवे (आठ हजार), सिध्दी विनायक युवक संघ- नेरूल, शिवाय प्रत्येकी सात हजारांची पाच पारितोषिके डोंगरी शिगमोत्सवसमिती, गणेश सांस्कृतिक मंडळ- म्हापसा, नवदुर्गा शिगमोत्सव मंडळ, शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह साखळ्यो- सांकवाळ- मंडळेश्‍वर मांगुर, शिरोडा यांना देण्यात आली.
लोकनृत्य स्पर्धा : द्वितीय (पंधरा हजार रुपये)- लाखेरी सांस्कृतिक कला मंडळ, बोर्डे- डिचोली, तृतीय (दहा हजार)- शक्ती सेल्फ हेल्प ग्रुप, नागेशी-फोंडा, उत्तेजनार्थ (प्रत्येकी पाच हजार)- कोकण पाईक महिला मंडळ, केपे, गोपाळ कृष्ण कला संघ, प्रियोळ, सरस्वती कला मंडळ, कुर्टी-फोंडा, उत्तेजनार्थ (प्रत्येकी तीन हजार)- यमुना स्पोर्ट्‌स ऍण्ड कल्चरल क्लब, म्हार्दोळ, घडवंश लोकमांड, केरी-सत्तरी, रायझिंग युथ क्लब, कुडचडे, महारूद्र कला मंडळ, केळबाई-कुर्टी, कमलावती रवळनाथ सांस्कृतिक मंडळ, करमळी उत्तेजनार्थ (प्रत्येकी दोन हजार)- सासोवकन महिला मंडळ, केपे, जन्मी पाईक महिला मंडळ, केपे, ओमसाई सुदालेवाडी- केपे, तुळशी माया महिला मंडळ, केपे.
वेशभूषा स्पर्धा : मोठा गट – प्रथम – स्वाती पोकळे (कालिमाता), द्वितीय- दामोदर कारेकर (नृसिंह), तृतीय- संदीप मयेकर (पंचमुखी महादेव), उत्तेजनार्थ- आनंद दिवकर, लक्ष्मण भवाडे, अनंत नाईक, संजय नाईक, यादव गावडे, जॉन पिंटो, जयेश पावगडे, धर्मा नाईक, शांताराम शेट, सिध्दांत काणेकर, रजनीकांत नाईक.
वेशभूषा : लहान गट : प्रथम – कृष्णा अरूण परब (कडक लक्ष्मी), द्वितीय- श्रीयश मडगावकर (नेताजी बोस), तृतीय – लक्ष्मी मोरजकर (रावण), उत्तेजनार्थ- ब्लाझिया रिबेलो, संकेत नाईक, शौनल कामत सातोस्कर, कनिष्क नीलेश नाईक, कार्तिक शेटगांवकर, अतिथी पोकळे, सर्वज्ञ पाटील, दिवेश नाईक, अनुष्का मोरजकर, ओंकार उदय शेट.
शनिवारी रात्री १ वाजता पारितोषिक वितरण सोहळा झाला. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या हस्ते नाट्यकलाकार सुभाष बाबू परब येळेकर (आमोणा- डिचोली), तियात्रीस आंद्रे मारियानो डिसोझा (रायबंदर) व नाट्य तथा भजनी कलाकार शिवा बाळकृष्ण परब (मेणकूरे) यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. श्री. धेंपे तसेच समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक व कोषाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉ. अजय वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.