कुंकळ्ळीच्या आमदारांना गिरदोली येथे घेराव

0
215

कोळसाविरोधी ठरावावेळी विधानसभेत उपस्थित न राहिल्याने कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांना गिरदोली व चांदरच्या नागरिकांनी घेराव घालत जाब विचारला. गिरदोली येथे रेलमार्ग दुपदरीकरण करताना मातीचा भराव टाकून पारंपरिक पाण्याचे तळे बुजवल्याबद्दल पहाणी करण्यासाठी आमदार डायस आले होते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना घेराव घातला.

रेलमार्गाचे काम करताना तळे बुजवले, मानस मोडली तरी आमदार गप्प राहिले. त्यामुळे स्थानिकांनी जाब विचारला. आमदार डायस हे लोकांनी मागणी केल्यामुळे घटनास्थळी आले होते. पहाणी करताना स्थानिकांनी त्यांना घेराव घातला.

काम बंद करण्याचा आदेश
दरम्यान, आमदार डायस यांनी, पहाणी केल्यानंतर तळे साफ होईपर्यंत रेल्वेला काम बंद करण्याचा आदेश आमदार डायस यांनी दिला. जलस्त्रोत खात्याने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना केली. तसेच विवादीत जमीन मालकीची कागदपत्रे दाखवण्याची सूचना रेल्वे निगमला त्यांनी केली. त्यावेळी जलस्त्रोत खात्याचे अभियंते गावकर हे उपस्थित होते. गावकर्‍यांनी काम बंद केले असता रेल्वे निगमने पोलिसांच्या मदतीने हे काम बळजबरीने सुरू केले होत