कीर्ती आझादांसह अशोक अन्वर कॉंग्रेस पक्ष सोडून तृणमूलमध्ये

0
19

गेल्या काही महिन्यांमध्ये काही मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये आता कीती४ आझाद आणि अशोक अन्वर या दोन नावांचा समावेश झाला आहे. या दोन्ही नेत्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

आधी भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी आता तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीमधील ममता बॅनर्जी यांच्या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. बिहारच्या दरभंगामधून किर्ती आझाद तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २०१५ साली त्यांची तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधील गैरकारभाराविषयी टीका केल्याप्रकरणी भाजपने हकालपट्टी केल्यावर त्यांनी २०१९मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

तसेच एकेकाळी राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अशोक तन्वर यांनीदेखील काल तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक तन्वर हे हरयाणा कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. तसेच, हरयाणामधील सिरसा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. तन्वर यांनी २०१९मध्येच कॉंग्रेसला रामराम ठोकून ‘अपना भारत मोर्चा’ची स्थापना केली. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांशी विशेषत: हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्यासोबत तीव्र मतभेद झाले होते.