किमान वेतन वाढीसाठी राज्य सरकारकडून मसुदा अधिसूचना जारी

0
20

राज्य सरकारने विविध क्षेत्रातील कामगारांचे किमान वेतन वाढवण्यासाठी मसुदा अधिसूचना १० नोव्हेंबर रोजी जारी केली आहे.

राज्य सरकारने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या किमान दराशी संबंधित मसुदा अधिसूचना जारी केली. रोजगाराच्या क्षेत्रानुसार किमान वेतनाचे दर वेगवेगळे ठरविण्यात आले आहेत.

अकुशल कामगारांसाठी किमान वेतन ५५३ रुपये प्रतिदिन, अर्धकुशल कामगारांसाठी ६२५ रुपये प्रतिदिन, कुशल कामगारांसाठी ७३४ रुपये प्रतिदिन, उच्च कुशल कामगारांसाठी ८०६ रुपये प्रतिदिन, तर कारकुनी कामगारांसाठी ७३४ प्रतिदिन असे वेतन निश्‍चित करण्यात आले आहे. राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात गेल्या काही वर्षात वाढ करण्यात आलेली नाही. या मसुद्यावरील सूचना आणि हरकती सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

सूचना, हरकती सचिव (कामगार) गोवा सरकार कामगार विभाग पर्वरी गोवा येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन महिन्यांनंतर हा मसुदा विचारात घेतला जाणार असून, प्रस्तावाला अंतिम स्वरूप देताना हरकती, सूचना विचारात घेतल्या जाऊ शकतात.