किनारी विभाग प्राधिकरणाला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका

0
105

>> आदेश न पाळल्याने १ कोटी दंड

गोव्यातील कासव संवर्धन केंद्रातील बेकायदा तात्पुरत्या बांधकामावर कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन न केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला १ कोटीचा दंड ठोठावला आहे.

पर्यावरण नुकसान भरपाईपोटी हा दंड ठोठावण्यात आला असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एका आठवड्यात दंडाची रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे.
राष्ट्रीय हरीत लवादाने नोव्हेंबर २०१७ मध्ये गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला कासव संवर्धन जागांतील तात्पुरत्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. एनजीटीने या आदेशाचे पालन न केल्याने जीसीझेडएमएला फैलावर घेतले. मोरजी, मांद्रे, गालजीबाग आणि आगोंद येथील जागांवरील बेकायदा बांधकामावर कारवाईचा आदेश दिला होता.