काही बाबतीत नियमभंग दंड रक्कम कमी करणे शक्य

0
147

>> वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो

नव्या मोटार वाहन कायद्यात दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे ही बाब खरी असून काही वाहतूक नियम भंगाच्या बाबतीत दंडाची रक्कम कमी करण्याबाबत विचार करणे शक्य आहे, असे काल वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचबरोबर दारु पिऊन वाहन चालवणे व वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवणे हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे असून त्याबाबत दंडाची रक्कम कमी करण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
जानेवारी येत्या पासून नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गुदिन्हो म्हणाले. रस्त्यावर खड्डे आहेत म्हणून नवा मोटार वाहन कायदा लागू करता येत नाही असे नाही.

मात्र, गोवा सरकारने राज्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी करुन झाल्यावरच नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गुदिन्हो यानी स्पष्ट केले. येत्या नोव्हेंबर महिन्यपर्यंत राज्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार असून खड्डे बुवजले जातील. आपण स्वतः त्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंतची वाट पाहण्याचे ठरवले आहे.