काश्मीरप्रश्‍नी अमित शहा-डोवाल बैठक

0
108

>> राजकीय घडामोडींना वेग, नागरिकांत संभ्रम

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या लष्करी हालचाली आणि मागवण्यात आलेला मोठा ङ्गौजङ्गाटा या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत गृहसचिव राजीव गौबा हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होऊन पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बैठक संपल्याबरोबर जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार यांच्याशीही शहा यांनी चर्चा केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी सुरक्षेचे कारण देत सरकारने अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना तत्काळ काश्मीर सोडण्याचा आदेश देणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून काश्मीरमधील घटनाक्रमाबाबत विविध शक्यता वर्तविण्यात येत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार काश्मीरमध्ये काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केवळ सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काश्मीर खोर्‍यात प्रचंड प्रमाणात सशस्त्र पोलीस पाठविण्यात आल्यामुळे तिथे तणाव वाढला असून, काश्मीर खोर्‍यात मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या भीतीने भाजीपाला, अन्नधान्य, तसेच पेट्रोल खरेदीसाठी शनिवारी प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आणि बँका व एटीएममधून पैसे काढण्यासाठीही लोकांनी गर्दी केली.

२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत
पाकिस्तानच्या सीमेवरील विविध लॉंच पॅडवर सध्या २०० ते २५० दहशतवादी सज्ज आहेत आणि ते काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत, असे लष्करी अधिकार्‍याने म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत गेले, तेव्हा या सर्व दहशतवाद्यांनी सीमेवरून हटविण्यात आले होते. इम्रान खान परतताच अतिरेकी पुन्हा लॉंच पॅडवर आले आहेत, असे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सध्या काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संविधानातील कलम ३५ अ आणि कलम ३७० रद्द करण्यासाठीच मोदी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्ङ्गरन्सचे नेते ङ्गारूख अब्दुल्ला यांच्या घरी विरोधकांची बैठक झाली.