काश्मीरचे फुटिरवादी नेते सय्यद गिलानी यांचे निधन

0
46

काश्मीरमधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी (९२) यांचे काल निधन झाले. श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.

गिलानी यांच्या निधनानंतर काश्मीर खोर्‍यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीटद्वारे शोक व्यक्त केला आहे.

गिलानी आधी जमात ए इस्लामी काश्मीरचे सदस्य होते. पण नंतर त्यांनी तहरीक ए हुर्रियत नावाचा आपला पक्ष स्थापन केला. गिलानी हे तीनवेळा आमदार झाले होते. पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मान केला होता. फुटिरतावादी नेते गिलानी हे भारतविरोधी वक्तव्यामुळे कायम वादात असायचे.